crime x
क्राईम

Crime : घराची मालकीण मुलीला चहा देऊन बेशुद्ध करायची, तिचा मुलगा मित्रांसह अत्याचार करायचा; ७ महिन्यांनंतर...

Crime News : घरात काम करणाऱ्या मुलीवर मालकिणीचा मुलगा आणि त्याचे मित्र अत्याचार करत असत. यात घराची मालकीण देखील सामील होती. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला.

Yash Shirke

Shocking : एका १६ वर्षीय किशोरवयीन मुलीवर तिच्या मालकिणीच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. ही पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील नौचंडी भागात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौचंडी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीच्या आईने अनेक गंभीर आरोप केले आहे. तिची मुलगी ही कैलाशपुरी परिसरातील एका घरात काम करत असे. ती ज्या घरात काम करायची, त्या घराची मालकीण अनेकदा चहात काहीतरी मिसळून तिला बेशुद्ध करायची. त्यानंतर महिलेचा मुलगा आणि त्याचे मित्र माझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करायचे, असे पीडितेच्या आईने आरोप केले आहेत.

जेव्हा याप्रकरणाचा जाब विचारला, तेव्हा आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेनंतर नौचंडी पोलिसांनी टीपी नगर अंसल कॉलनीतील एका डॉक्टरसह तिघांच्या विरोधात जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक देखील केली.

घरची स्थिती हालाखीची असल्याने पीडित १६ वर्षीय तरुणी ही घरकामासाठी जात असे. याचा फायदा घरमालकीण आणि तिच्या मुलाने घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर, तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीच्या कुटुंबाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT