SURAT FARMHOUSE RAID: 22 ARRESTED INCLUDING 8 WOMEN IN LIQUOR PARTY saam tv
क्राईम

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

Police Raid Farmhouse Party In Surat: गुजरातमधील दारूबंदी असतानाही सुरतमधील फार्महाऊसवर सुरू असलेल्या कथित दारू पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. कारवाईत ८ महिलांसह २२ जणांना अटक करण्यात आली.

Bharat Jadhav

  • सुरतमधील एका फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकली.

  • फार्महाऊसमध्ये कथित दारू पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

  • कारवाईदरम्यान ८ महिलांसह एकूण २२ जणांना अटक करण्यात आली.

गुजरातमधील सुरतमध्ये असलेल्या एका फार्म हाऊसवर पोलीस धाड टाकत २२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या २२ जणांमध्ये ८ महिलांचा समावेश आहे. गुजरातमध्ये मद्यनिर्मिती, विक्री, साठवणूक आणि सेवन करण्यास बंदी आहे. दारूला बंदी असतानाच सुरतमधील एका फॉर्महाऊसमध्ये भंयकर प्रकार चालू चालू होता. पोलिसांच्या धाडीनंतर येथील दारू पार्टीचा भांडाफोड झालाय.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,पोलिसांना त्या पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांन धाड टाकली. सुरत शहरातील सुलतानाबाद भागात असलेल्या बापूजी नी वाडी नावाच्या फॉर्म हाऊसमध्ये पोलिसांनी धाडीची कारवाई केली. या फॉर्महाऊसमध्ये २५ ते ३० वय वर्ष असलेला महिला आणि पुरुषाचा ग्रुपची दारू पार्टी चालू होती.

वाढदिवस साजरा केला जात होता

सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) श्वेता डॅनियल्स यांनी पत्रकारांना माहिती दिली की, पोलिसांनी घटनास्थळावरून मद्य भरलेले अर्धे ग्लास, मद्याच्या पाच उघड्या बाटल्या आणि बिअरचे कॅन जप्त केले. तसेच, पोलिसांनी त्या ठिकाणाहून नऊ गाड्या आणि मोबाईल फोनही जप्त केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जे जमले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील विविध भागांतून आलेल्या आणि फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या १४ पुरुष व ८ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी त्या सर्वांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'गुजरात प्रोहिबिशन ॲक्ट' (मद्यबंदी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.

गुजरातमध्ये आहे दारू बंदी

गुजरात हे 'ड्राय स्टेट' (मद्यबंदी असलेले राज्य) म्हणून ओळखले जाते. तिथे मद्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि सेवन करण्यास मनाई आहे. या कायद्यांतर्गत, सुरत येथील एका फार्महाऊसवर मद्यपान केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

Ice Coffee Benefits : एक कप आईस कॉफी आरोग्यासाठी बेस्ट, जाणून घ्या 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT