State Excise Department Action  
क्राईम

Pune Crime: पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; विदेशी मद्यासह ७६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

State Excise Department Action : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका गावात राज्य उत्पादन शुल्काने कारवाई करत विदेशी दारू जप्त केलीय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात धडक कारवाई केलीय. तालुक्यात असलेल्या आदरवाडी गावाच्या हद्दीतील हॉटेल शैलेश समोरील पौड- माणगाव रस्त्यावर कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

गोवा राज्य निर्मीत व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरीता परवानगी असलेल्या पोलंड प्राईड प्रिमियम कलेक्शन रिझर्व्ह  व्ह‍िस्की या ब्रॅण्डच्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ३३ हजार ६०० सीलबंद बाटल्या (७०० बॉक्स ) वाहनात मिळून आल्या. मद्याची वाहतूक करण्याकरीता वापरलेला तपकिरी रंगाचा सहाचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच-०३- डीव्ही ३७१६ आणि मोबाईल फोन असा अंदाजे ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

या गुन्ह्यामध्ये वाहन चालक जुल्फेकार ऊर्फ जुल्फेकार ताजअली चौधरी (वय ५० वर्षे) रा. हाऊस नं. २०४, मोहल्ला नाली पाडा, मसूरी डासना आर. एस. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश यास अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक विराज माने, अतुल पाटील, धीरज सस्ते, जवान  प्रताप कदम, सतिश पोंधे, अनिल थोरात, शशीकांत भाट, राहुल ताराळकर, महिला जवान उषा वारे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विराज माने करत आहेत, अशी माहिती पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT