Spanish Women Case Saam TV
क्राईम

Spanish Women Case : पतीचे हात-पाय बांधले अन्...; अत्याचार पीडित स्पॅनिश महिलेने सांगितला त्या रात्रीचा भयंकर प्रसंग

Jharkhand Crime News : या प्रकरणात एकूण ७ जण शामील होते. त्यापैकी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच लवकरात लवकर अन्य ४ जाणांच्या पोलीस मुसक्या आवळणार आहेत.

Ruchika Jadhav

Jharkhand Spanish Women :

स्पॅनिशमधील महिलेवर झारखंडमध्ये सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केलाय. या तपासात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावली असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक पीतांबरसिंग रेखवार यांनी या घटनेबाबत माहिती दिली, यावेळी ते म्हणाले की, महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्यार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात एकूण ७ जण शामील होते. त्यापैकी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच लवकरात लवकर अन्य ४ जाणांच्या पोलीस मुसक्या आवळणार आहेत.

पीडित महिला २८ वर्षीय असल्याची माहिती समजली आहे. ती आपल्या पतीसह भारतात फिरण्यासाठी आली होती. आधी ते दोघे स्पेनमधून पाकिस्तानला गेले होते. तेथून त्यांनी बांगलादेशला फिरण्याचा निर्णय घेतला. तेथून पुढे ते भारतात आले. यावेळी त्यांनी झारखंडच्या (Jharkhand) दुमका येथे राहण्याचा निर्णय घेतला.

दुमकाच्या हंसडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंजी गावात ते टेंटमध्ये थांबले होते. झारखंडमध्ये फिरल्यानंतर दोघेही पती-पत्नी नेपाळला फिरण्यासाठी जाणार होते. त्याआधीच महिलेवर येथील ७ जणांच्या टोळक्याने अत्याचार केला. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे.

या प्रकरणी सीआयडी आणि फॉरेन्सिक टीम चौकशी करत आहे. घटनास्थळी मिळालेल्या गोष्टी जप्त केल्यावर त्या आधारे ३ जणांनी पोलिसांचा शोध घेतला आहे. अन्य ४ जणांविषयी देखील कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या घरांसह नातेवाईकांची चौकशी करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं पोलिसांनी म्हटलंय.

माझ्या पतीचे हातपाय बांधले होते...

पीडित महिलेने घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे. रात्रीच्या अंधारात ७ जण त्यांच्या टेन्टमध्ये आले. महिलेवर अत्याचार झाला तेव्हा तिचा पती देखील तेथेच होता. आरोपींनी त्याचे हात-पाय बांधून ठेवले होते. तसेच त्याला बेदम मारहाण केली होती. आरोपी एवढे क्रूरतेने वागत होते की, पीडितेला तिचा मृत्यू होईल असं वाटत होतं. शुक्रवारी रात्री उशिरा गस्तीवर असलेल्या हंसदिहा पोलिस स्टेशनच्या पोलिसांना हे जोडपे रस्त्याच्या कडेला दिसले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

SCROLL FOR NEXT