Mumbai News Saam TV
क्राईम

Mumbai News: श्रीमंत बापाची लेक पडली ड्रायव्हरच्या प्रेमात; लंडन सोडून थेट झोपडपट्टीत राहायला आली

Mumbai Love Story News: मुलगी साध्यासुध्या घरातली नसून तिचे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत. पण या दोघांमध्ये प्रेम झालं तरी कधी? मुलगी पळून गेल्यानंतर तिच्या पालकांची काय अवस्था झाली?

Ruchika Jadhav

तुषार ओव्हाळ

South Mumbai:

दक्षिण मुंबईत राहणारी एक तरुणी एका ड्रायव्हरच्या प्रेमात पडीली. फक्त प्रेमात नाही पडली तर ही तरुणी या ड्रायव्हरसोबत पळूनही गेलीये. ही मुलगी साध्यासुध्या घरातली नसून तिचे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत. पण या दोघांमध्ये प्रेम झालं तरी कधी? मुलगी पळून गेल्यानंतर तिच्या पालकांची काय अवस्था झाली? पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं का? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिलीये. मलबार हिल येथे ही घटना घडली आहे. मलबार हिल म्हणजे मुंबईच्या दक्षिण भागातला चकाचक एरिया. याच भागात मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे. या भागात काही सरकारी अधिकाऱ्यांची शासकीय वसाहती आहे. याच वसाहतीत एक 19 वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तिचे वडिल मोठे अधिकारी. आपल्या मुलीने शिकून खुप पुढे जावं अशी त्यांची इच्छा होती.

म्हणून वडिलांनी तिला इंग्लंडला शिकण्यासाठी पाठवलं. गेल्या वर्षी ख्रिसमसची सुट्टी असल्याने ती भारतात परतली होती. आता जानेवारी महिन्यात तिची सुट्टी संपली म्हणून ती परत लंडनला निघाली होती. आई वडिलांची रजा घेतल्यानंतर ही तरुणी एअरपोर्टकडे निघाली. पण मध्येच ती ताडदेवला थांबली. काही तरी विकत घेण्यासाठी ती खाली उतरली. उतरल्यानंतर ती रस्त्याच्या पलीकडे गेली आणि एका टॅक्सीममधून पळून गेली.

या तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. एका ड्रायव्हरने आमच्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली. पण तरुणीचे वय 19 वर्ष असल्याने पोलिसांनी फक्त हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर एक वेगळीच माहिती त्यांच्यासमोर आली.

मलबार हिलमध्येच एका सरकारी अधिकाऱ्याकडे बजरंग मौर्या हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गेल्या चार वर्षांपासून तो या तरुणीला ओळखत होता. दोघांची ओळख वाढली आणि दोघे प्रेमात पडले. पोलिसांनी बजरंग मौर्या आणि तरुणीचे फोन ट्रेस करायला सुरुवात केली. दोघेही आपले लोकेशन सतत बदलत होते.

बजरंगच्या संपर्कात एक व्यक्ती होती. ती म्हणजे अजित कुमार. अजित कुमार हा बजरंगचा भाऊ. तो रहायला होता उत्तर प्रदेशच्या अयोध्येत. मुंबई पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशात गेली आणि अजित कुमारच्या घरी पोहोचली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस, कानातले, घड्याळ आणि तब्बल साडे नऊ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी अजित कुमारला ताब्यात घेतलं आणि मुंबईत आणलं.

अजितने पोलिसांना सांगितलं की त्या तरुणीनेच हे पैसे आणि दागिने बजरंगला दिले होते. बजरंगने हा ऐवज भावाला सांभाळायला दिला होता. नंतर पोलिसांना बजरंग आणि तरुणीचे लोकेशन कळव्यात सापडले. पोलीस या ठिकाणी गेले आणि एका खोलीत त्यांना बजरंग आणि ही तरुणी सापडली. पळून गेल्यानंतर या दोघांनी लग्न केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर या दोघांनी कळव्यातल्या एका झोपडपट्टीत भाड्याने घरही घेतलं होतं.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि मुंबईत आणलं. पोलिसांनी बजरंगची चौकशी केली, तेव्हा आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. बजरंगचं आधीच लग्न झालं आहे. त्याची बायको उत्तर प्रदेशमध्ये राहते असंही कळालं आहे. सध्या तरी पोलिसांनी बजरंगला ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरु केलीये. पण या प्रकरणात प्रेम किती आंधळं असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT