Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale Saam Tv News
क्राईम

Dr. Shirish Valsangkar Death Case : सोलापुरचे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, महिलेने धमकी दिल्याची माहिती

Dr. Shirish Valsangkar Death Case Update : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने या संशयित महिलेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.

Prashant Patil

विश्वभूषण लिमये, साम टिव्ही

सोलापूर : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एसपी न्यूरोसायन्स वळसंगकरांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (रा.सोलापूर) या संशयीत महिलेस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर, सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने या संशयित महिलेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत.

सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीप्रमाणे फिर्यादी डॉ. अश्विन यांनी आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करून देखील संशयीत आरोपी मनीषा मुसळे फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी देत होती. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तूलमधून स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केली आहे. मनीषा मुसळे हिच्यामुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. अशी तक्रार डॉ अश्विन वळसंगकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT