Shirish Valsangkar Suicide note Saam Tv News
क्राईम

Dr. Shirish Valsangkar : ज्याला शिकवून अधिकारी केलं...; डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोटवर अन् रिमांड मजकूरमध्ये काय काय नमूद?

Dr. Shirish Valsangkar Suicide Note : ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. (प्रशासकीय अधिकारी) केलं आणि चांगला पगार देतो आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे.

Prashant Patil

सोलापूर : सोलापूरातील नामांकित सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात वेगळं वळण आलंय. वळसंगकर यांनी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून या प्रकरणात एका संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शिरीष वळसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? आणि रिमांड कॉपीतील मजकूर नेमका काय आहे?

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोटवरील मजकूर

ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. (प्रशासकीय अधिकारी) केलं आणि चांगला पगार देतो आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.

पोलिसांच्या रिमांड कॉपीतील मुद्दे

आरोपी महिलेनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून तिच्यामुळे नामांकित डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं. मयतानं मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, त्यात 'महिल्याच्या खोटारड्या आणि घाणेरड्या आरोपामुळे मी माझे जीवन संपवत आहे', असं नमूद केलं आहे. आरोपीने मयत डॉ. शिरीष वळसंगकर यांना १७ एप्रिल २०२५ रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्राची छायांकित प्रत जप्त केली असून याशिवाय नमूद महिला आरोपीनं कोणते खोटारडे आणि घाणेरडे आरोप मयतावर केले होते याबाबत तपास करायचा आहे.

खोटारडे आणि घाणेरडे आरोपांमध्ये आरोपीचा हेतू आणि उद्देश काय होता याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर आरोपीस या कृत्यामध्ये कोणी मदत केली आहे का कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. आरोपी महिलेच्या हस्ताक्षराचे नमुने आम्हाला घ्यायचे आहेत. आरोपीने मयतास कशा पद्धतीने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं, याचा देखील तपास करण्याकामी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT