Solapur Crime News SaamTV
क्राईम

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Solapur Crime: सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका ७३ वर्षीय वृद्धाने कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ७३ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना.

  • सर्जेराव शंकर नायकुडे असे मृत व्यक्तीचे नाव.

  • मुलगा आणि सुनेच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप.

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलीय. 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं सकाळी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे आत्महत्या केली. सर्जेराव शंकर नायकुडे, असं आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा आणि सूनेविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जेराव शंकर नायकुडे आणि फिर्यादी त्यांचा मुलगा हे बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील स्वतःच्या बंगल्यात राहत होते. तर फिर्यादीचा भाऊ व त्याची पत्नी हे काही महिन्यांपासून कुर्डुवाडी रोड परिसरात राहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे सासरे हे त्यांच्याकडे राहत होते. तेव्हा सून त्यांना किरकोळ कारणावरून सतत अपमानित करत. सासऱ्यांना मानसिक त्रास देत होती. त्यामुळे सासरे हे मानसिक तणावात होते. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून ते नाईकवाडी प्लॉट बार्शी येथे आले. त्यांनी मंगळवारी टोकाचा निर्णय घेत विषारी द्रव्य पिऊन जीवन संपवले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

फिर्यादी महेश नायकुडे यांचा भाऊ उमेश याची पत्नी सारिका उमेश नायकुडे ही गेल्या काही महिन्यांपासून सर्जेराव नायकुडे यांना अपमानित करत होती. 'तुला घरातून हाकलून देईन...', असं म्हणत सतत मानसिक त्रास देत होती, अशी फिर्याद महेश यांनी दिलीय. सतत होणारा अपमान आणि सुनेच्या जाचामुळे सर्जेराव नायकुडे यांनी आपल्या राहत्या घरात जीवनयात्रा संपवली. महेश सर्जेराव नायकुडे (वय 41) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सून सारिका उमेश नायकुडे हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लग्न जमलं नाही म्हणून मुलाने बापालाच संपवलं, सोलापुरातील धक्कादायक घटना

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात वडिलांचा मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली. शेती विकण्याचा निर्णय आणि लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली. रमेश बट्टू कुंभार (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी त्यांचा मुलगा अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्येची घटना सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे पाटील मळा परिसरात सोमवारी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

SCROLL FOR NEXT