Panvel Crime  Saam Tv
क्राईम

Panvel Crime News: पनवेलमध्ये हाफ चड्डी गॅंगची दहशत; चोरट्यांचा फार्म हाऊसवर चोरीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Robbery At Farm House: पनवेल तालुक्यात हाफ चड्डी गॅंगची दहशत निर्माण होत आहे. चोरट्यांनी तालुक्यातील एका फार्म हाऊसवर चोरीचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Rohini Gudaghe

Robbery At Usarli Shivkar Village

दिवसेंदिवस चोरी, दरोडा अशा घटना वाढत आहेत. आतापर्यंत आपण चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या गॅंग पाहिल्या आहेत. जसं की, कोयता गॅंग. पण पनवेलमधून (Panvel) आता एक नवीन गॅंग समोर येत आहे. या गॅंगचं नावंही विचित्र आहे. आपण या गॅंगविषयी आणि चोरीच्या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

पनवेल तालुक्यात हाफ चड्डी गॅंगची दहशत निर्माण होत आहे. सहा चोरट्यांनी तालुक्यातील उसर्ली-शिवकर गावातील फार्म हाऊसवर चोरीचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्ही (cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली (Panvel Crime News) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हाफ चड्डी गँगने चोरी केली

उसर्ली-शिवकर गावातील (usarli Shivkar village) एका फार्म हाऊसवर हाफ चड्डी घालून सहा चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॉमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पनवेल शहर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील उसर्ली-शिवकर गावातील राकेश जैन यांच्या फार्महाऊसवर एका हाफ चड्डी गँगने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फार्म हाऊसवर किंमती ऐवज नसल्याने या चोरट्यांना खाली हात परतावं लागलं (Robbery At Farm House) आहे.

पोलिसांनी नागरिकांची सुरक्षा वाढवली

परिसरात हाफ चड्डी घालून चोरी (Robbery) करणारे कुठल्या टोळीचे आहेत का, याचा तपास पोलीस करत आहे. फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षक आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना पनवेल शहर पोलिसांनी केल्या आहेत. यासोबतच नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून गस्त वाढवली गेली आहे. नाकाबंदीचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी (Panvel city police) दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT