wife killed husband  Saam tv
क्राईम

टीव्हीचा आवाज कमी कर; नवरा ओरडला, भडकलेल्या बायकोने चाकूने भोसकून संपवलं

wife killed husband : नवरा ओरडल्याने बायको भडकली. त्यानंतर संतापलेल्या बायकोने नवऱ्याला संपवलं. घटनेने परिसरात एकच खळबळ

Vishal Gangurde

आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ वादातून घडली धक्कादायक घटना

टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून नवरा-बायकोमध्ये भांडण.

पत्नीने चाकूने हल्ला केल्याने नवऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू

आंध्र प्रदेशच्या मंगलगिरीमध्ये किरकोळ वादातून हादरवणारी घटना घडली आहे.नवऱ्याने टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितल्याने भडकलेल्या बायकोने भयंकर कृत्य केलं आहे. बायकोने केलेल्या धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध प्रदेशच्या मंगलागिरी पोलीस स्टेशनच्या मुरली कृष्णा यांनी सांगितलं की, 27 वर्षीय शेख अहमदने २५ वर्षीय पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं.

दोघांचं आठ महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. ते अमरावतीमध्ये राहत होते. टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने बायकोने नवऱ्याला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान महिलेने नवरा अहमदवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अहमदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचारादरम्यान अहमदचा मृत्यू झाला. अहमदच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

अहमदच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आईने पोलिसांत तक्रारीत म्हटलं की, 'माझ्याने मुलाने टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितला होता. त्यावरून सूनेने मुलावर चाकूने हल्ला केला'.

पोलीस अधिकारी मुरली कृष्णा यांनी सांगितलं की, घरातील किरकोळ वादातून बायकोने नवऱ्यावर चाकूने हल्ला केला.दोघांचं लग्न आठ महिन्याआधी झालं होतं. अहमदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक करण्यास पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे'. अहमदच्या मृत्यूने मंगलगिरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बायकोने नवऱ्यावर का हल्ला केला?

टीव्हीच्या आवाजावरून वाद वाढल्यानंतर पत्नीने धारदार शस्त्राने नवऱ्यावर हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ६ नवे बोगदे, एमएसआरडीसीचा मोठा निर्णय

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; 'या' कर्मचाऱ्यांची होणार सर्वाधिक पगारवाढ

Balushahi Recipe: गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट बालुशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT