Crime  
क्राईम

Crime : सोडचिठ्ठी न देता पत्नी दुसरं लग्न करायला निघाली, पतीने टोकाचे पाऊल उचलले, पोलीस स्टेशनसमोरच पेट्रोल ओतून...

Crime News Update : ती सोडचिठ्ठी होण्यापूर्वीच दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली. त्यामुळं तो आज सासरवाडी येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता.

Namdeo Kumbhar

रणजीत माजगावकर

कोल्हापूर / इचलकरंजी : पत्नी सोडचिठ्ठी न देताच दुसरा विवाह करत असल्यानं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात इसमानं अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेखर गायकवाड असं त्याचं नाव आहे. या घटनेमुळं पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली. त्या इसमाची जीव वाचवण्यासाठी सुरु असलेली धावपळ आणि भयभीत झालेल्या पोलिसांसह नागरीकांचे त्याला वाचवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहून अनेकांनी अश्‍चर्य व्यक्त केलं. अखेर त्याला आयजीएम रुग्णालयात आणलं. प्राथमिक तपासात 60 टक्के भाजल्याचं निष्पन्न झालं असून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवलं आहे.      

सोलापूर जिल्ह्यातील करकंब, अकलुज इथं राहणारा शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे. त्याची पत्नी सद्या सासरवाडीत राहत होती. ती सोडचिठ्ठी होण्यापूर्वीच दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली. त्यामुळं तो सासरवाडी येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता. यातून त्यांच्यात भांडण झालं. त्यामुळं शेखरनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांसमोर त्यानं आपली कैफीयत मांडली. पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला मात्र त्यानं अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. बघता बघता अंगावरील कपडे पेटल्यानं जीव वाचवण्याच्या आकांतानं तो सैरभैर पळु लागला.

वाचवा, वाचवा म्हणत त्यानं पोलीस ठाण्यातही प्रवेश केला. यावेळी पोलीस आणि नागरीकांनी त्याच्या अंगावर माती टाकून पाण्यात उडी घेण्याचा सल्ला दिला. तरीही त्यानं पेटलेल्या स्थिती पोलीस गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींनी स्वत:चे कपडे काढून त्याला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली. त्यामुळं आग आटोक्यात आली मात्र या घटनेमुळं पोलीस आणि परिसरातील नागरीकही भयभीत झाले होते. अखेर त्याला पोलीस गाडीत आयजीएम रुग्णालयात आणलं.

प्राथमिक उपचारात 60 टक्के भाजल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्याचा निर्णंय झाला. मात्र पत्नी किंवा सासरवडीतील नातेवाईक आल्याशिवाय पुढील उपचार न घेण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. अखेर त्याला पोलिसांनी सीपीआर रुग्णालयाकडं नेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT