Crime News: ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवा अन् बक्षीस कमवा, स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय

Women Harassment in Spa Centers: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तरूणीमुळे पोलिसांना याची माहिती मिळाली.
spa
spa Saam Tv News
Published On

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना जबलपूर येथील एका स्पा सेंटरमध्ये घडत होती. याठिकाणी सॅलरीच्या बदल्यात ग्राहकांसोबत देहविक्री करण्यास भाग पाडत होते. जर तरूणीनं नकार दिला. तर, तिला नौकरीवरून काढण्याची धमकी दिली जात होती. याच त्रासाला कंटाळून एका तरूणीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

तरूणीनं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 'नोकरीवर ठेवताना चांगला पगार मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी मला ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकण्यात येत होता. जेव्हा मी विरोध केला, तेव्हा मला कामावरून काढण्याची धमकी दिली. तसेच माझा छळ केला'.

spa
Crime: चारित्र्यावर संशय अन् नवऱ्याची सटकली, गर्भवती पत्नीचा गळा आवळला; नाशिक हादरलं

'स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना खुश करण्यास मला सांगितले. जर एखाद्या ग्राहकाला चांगले खुश केले तर, सॅलरीसोबत बक्षीसही दिलं जाईल, असं सांगण्यात आले होते. जेव्हा या गोष्टीला मी विरोध केला तेव्हा माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता', असं तक्रारीत तरूणीनं म्हटलं आहे.

spa
Crime: भयंकर! वडील वारले, आईनं सोडलं, पैशांसाठी आजी - आजोबांनी विकलं; लैंगिक त्रासाला..

पोलिसांनी तातडीनं स्पा सेंटरवर धाड टाकली आणि संचालकांची चौकशी केली. धाड टाकल्यानंतर पोलिसांनी काहींना अटक केली. तसेच त्यांना ताकीद दिली. जर स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य आढळले तर कारवाई करू, असं पोलीस अधिकारी राजपाल सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com