Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Mumbai Police: मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. दोघेही सोबत दारू प्यायले. त्यानंतर त्याने लाकडी काठीने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Priya More

मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. मुंबईच्या मालवणीमध्ये एका तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. २१ वर्षांच्या आशिष शेट्टीने आपल्या बहिणीचा प्रियकर नितीन सोलंकी (४० वर्षे) याची लाकडी काठीने बेदम मारहाण करत हत्या केली. हत्येनंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात गेला आणि बहिणीच्या प्रियकराला मारून टाकल्याचे त्याने सांगितले. 'साहेब, मी बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. मला अटक करा.', असे आशिष पोलिसांना म्हणाला. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला हत्येप्रकरणी अटक केली. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेला नितीन सोलंकी एका रुग्णालयात केअरटेकर म्हणून काम करत होता आणि त्याचे आशिषच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. अलिकडेच नितीनने आशिषच्या आई आणि बहिणीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संतप्त झालेल्या आशिषने नितीनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आशिष जोगेश्वरीमध्ये नितीनला भेटला. दोघांनीही एकत्र दारू प्यायली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष त्याला मालवणीतील रामेश्वर गल्लीतील कोळीवाडा येथील कृष्णा आश्रमातील एका खोलीत घेऊन गेला. तिथे रागाच्या भरात आशिषने लाकडी काठीने नितीनवर हल्ला केला. या हल्ल्यात नितीन गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे नितीनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मालवणी परिसरात खळबळ उडाली.

मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नितीनला जखमी अवस्थेत कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येत वापरलेली काठी जप्त केली आणि पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आशिष शेट्टी स्वतः पोलिस ठाण्यात आला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : भयंकर चक्रीवादळाचं सावट! 110 किमी वेगात हवा तांडव घालणार, IMD चा गंभीर इशारा, भारतावरही संकट?

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT