Dhula Ram from Jashpur married 10 times, but suspicion led him to kill his 10th wife in a shocking crime.  saam tv
क्राईम

Shocking News: एक नवरा, दहा बायका; ९ च्या नऊ पळाल्या, नंतर धुलारामचे १० व्या बायकोसोबत काळे कारनामे

Jashpur Man Married 10 Times : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एक चक्रावून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलंय. येथील एका व्यक्तीने एक -दोन नाही तर १० बायकांसोबत लग्न केलं. असं का केलं याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • जशपुर जिल्ह्यातील एका व्यक्तीने १० वर्षांत १० लग्नं केली.

  • प्रत्येक पत्नी त्याच्या मारहाणीमुळे आणि संशयामुळे घर सोडून गेली.

  • दहाव्या पत्नीवर चोरीचा संशय घेत धुला रामने तिची दगडाने हत्या केली.

धुलाराम नावाचा व्यक्ती जशपूरच्या सुलेसा गावचा रहिवासी आहे. लग्न करण्याच्या इच्छेने त्याने १० वर्षांत ९ लग्ने केली, पण एकदाही त्याचा संसार टिकला नाही. एकही बायको त्यांच्यासोबत नांदली नाही. प्रत्येकवेळी त्याच्या बायका पळून गेल्या. त्यामागे सर्वात मोठं कारणं होतं, ते म्हणजे धुलाराम आपल्या पत्नींवर नेहमी संशय घेत असायचा. संशयावरून तो त्यांना मारहाण करायचा, त्यामुळे त्याचं एकही लग्न सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ टिकलं नाही. अखेर त्याच्या आयुष्यात दहावी स्त्री आली. धुलाराम दहाव्यांदा नवरदेव बनला.

पण दहाव्या पत्नीसोबतही तेच तो करू लागला. १० व्या पत्नीवरही तो संशय घेत असायचा. याच कारणावरून त्याने १० पत्नीची हत्या केली. धुला राम आणि त्याची पत्नी एका लग्नाला गेले होते. धुला रामला संशय होता की, त्याच्या पत्नीने लग्नातून तांदूळ, स्वयंपाकाचे तेल आणि साडी चोरली आहे. यावरून दोघांमधील वाद झाला. हा वाद इतका वाढला की, त्याने आपल्या पत्नीवर दगडावर हल्ला केला.

पत्नीच्या डोक्यावर दगडाने हल्ला करत तिची हत्या केली. नंतर,आपला गुन्हा लपवण्यासाठी, धुलारामने मृतदेह जंगलात वाळलेल्या पानांमध्ये लपवून ठेवला. सुमारे ४ दिवस तो मृतदेह जंगलात कुजत राहिला आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: हसन मुश्रीफां डाव पटलला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

Rain Alert : महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढचे ६ दिवस राहा सतर्क!

SCROLL FOR NEXT