ऑस्ट्रेलियातील खासदार गॅरेथ वॉर्ड यांना दोन तरुणांवर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले
२०१३ आणि २०१५ मध्ये घडली होती घटना
खासदाराने मद्यधुंद अवस्थेत पीडितांवर केले होते लैंगिक अत्याचार
न्यायालयाने खासदाराला दोषी ठरवत सशर्त जामिनावर सोडले
खासदाराने २ तरुणांवर बलात्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ही घटना घडली. एका ऑस्ट्रेलियन खासदाराने या तरुणांवर बलात्कार केला. या खासदाराने दोन्ही तरुणांवर मद्यधुंद अवस्थेत हे भयंकर कृत्य केले. या दोन्ही घटना दोन वर्षांमध्ये घडल्या. न्यू साउथ वेल्समधील कियामामधील खासदार गॅरेथ वॉर्ड (४४ वर्षे) यांना शुक्रवारी डाउनिंग सेंटर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले.
द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, खासदार गॅरेथ वॉर्ड यांनी २०१३ मध्ये १८ वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी एका २४ वर्षीय तरुणाला घरी बोलावून संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले. या दोन्ही गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सध्या त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
सरकारी वकिलांनी सांगितले की, ज्या तरुणांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या दोन्ही व्यक्तींची साक्ष आश्चर्यकारकपणे सारखीच होती. बचाव पक्षाने म्हटले की, हे सर्व खोटे आहे. त्यांनी हे खोटे आरोप केले आहेत. क्राउन अभियोक्ता मोनिका नोल्स यांनी सांगितले की,'समान वर्तन, समान परिस्थिती, समान व्यक्ती, समान निष्कर्ष. हा योगायोग होत नाही.'
रिपोर्टनुसार, फेब्रुवारी २०१३ मध्ये खासदाराने एका तरुणाला आपल्या घरी बोलावून घेतलं. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी या तरुणावर एका रात्रीत तीन वेळा जबरदस्ती शरीरसंबंध ठेवलं. दोन वर्षांनंतर अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. एनएसडब्ल्यू संसद भवनात एका कार्यक्रमानंतर मद्यधुंद अवस्थेत खासदाराने एका कर्मचाऱ्यावर बलात्कार केला.
खासदार गॅरेथ वॉर्ड यांनी २०१५ मध्ये झालेल्या कथित बलात्काराचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी युक्तिवाद केला की, तक्रारदार २०२३ च्या घटनेला चुकीच्या पद्धतीने सांगत आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून सशर्त जामिनावर सोडण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन घरांपैकी एका घरामध्ये राहण्याची परवानगी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.