Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : महाराष्ट्र हादरला! नेहमीच्या वादाला कंटाळला, १६ वर्षाच्या मुलानं बापाला संपवलं

Maharashtra Crime News : परभणीत १६ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांचा चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Alisha Khedekar

परभणीत १६ वर्षीय मुलाकडून वडिलांची चाकूने हत्या

आईवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल

गणेश अंकुशराव भोसले यांचा घटनास्थळी मृत्यू

पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन तपास सुरु केला

परभणीतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने जन्मदात्याच्या पोटात धारदार चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. दारू पिऊन वडील आईला त्रास द्यायचे या रागातून या मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश अंकुशराव भोसले असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, परभणी तालुक्यातील इसाद येथील रहिवासी गणेश अंकुशराव भोसले हे सतत दारू प्यायचे. तसेच दारू पिऊन घरी येऊन बायकोला मारायचे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता आणि त्यांचा १६ वर्षीय मुलगा हा सर्व प्रकार बघत होता. मात्र मंगळवारी त्याचा संताप अनावर झाला. नेहमीप्रमाणे गणेश भोसले दारू पिऊन आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बायकोला मारहाण केली.

घडलेला हा प्रकार बघून गणेश यांचा मुलगा चिडला. रागारागाने स्वयंपाक घरातील चाकू घेऊन आला आणि दारू पिऊन आलेल्या जन्मदात्याच्या पोटात खुपसला. गणेश जागीच कोसळले आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी घटनेचे वृत्त कळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे आदि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी एकंदरीत घटनेचा पंचनामा नोंदविला आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयात मृत गणेश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली. दरम्यान या मुलावर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT