Jaipur Crime News Saam tv
क्राईम

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Jaipur Crime News : जयपूरमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाइकाकडून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला रंगेहात पकडले असून पोलिसांनी POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

जयपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

आरोपी मुलीचा नातेवाईक असल्याचं उघड

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनेतील दोन आरोपी फरार

जयपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. घरी आलेल्या नातेवाइकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेनंतर मुली स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब मूळचे हरियाणाचे असून जयपूरमध्ये भाड्याने राहत आहेत. पीडितेचे वडील हे मजूर म्हणून काम करतात. बुधवारी रात्री पीडित मुलगी तिच्या आई आणि दोन लहान बहिणींसह एका खोलीत झोपली होती. यादरम्यान तिच्या कुटुंबातील एक तरुण खोलीत आला, त्याने तिला उठवले आणि खोटे सांगत तिला छतावर नेले. तिथे पोहोचल्यावर त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

यादरम्यान पीडित मुलगी मोठ्याने ओरडू लागली. मुलीच्या आवाजाने शेजारचे जागे झाले. घरातील कुटुंबीयांनीही आवाजाचा मागोवा घेत गच्ची गाठली. मुलीच्या कुटुंबियांना घटनास्थळी आरोपी मुलीवर अत्याचार करताना आढळून आला. मुलीच्या वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी या आरोपी तरुणाला बेदम मारहाण केली.

पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका तरुणाविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेदरम्यान आरोपींवर देखरेख ठेवल्याबद्दल आणि मदत केल्याबद्दल आणखी एका तरुणाचे नावही नोंदवण्यात आले आहे. दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. या घटनेनंतर मुली स्वतःच्या घरी देखील सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transfers: ऐन महापालिका निवडणुकीत IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईसह पुण्यात मोठा प्रशासकीय बदल|VIDEO

Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलं

Washim : वाशिममध्ये एमआयएमची मुसंडी, पहिल्यांदाच नगरपालिकेवर सत्ता मिळवली, भाजपचा पराभव

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी टिव्हीवर येणार; दमदार होस्टिंगने शो गाजवणार, पाहा धमाकेदार VIDEO

SCROLL FOR NEXT