Shahapur Crime Saam Tv
क्राईम

Crime: घटस्फोट द्यायला नवऱ्याचा नकार, संतापलेल्या बायकोने काढला काटा; जंगलात नेऊन जाळलं

Shahapur Crime: शहापूरमध्ये बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटस्फोट द्यायला नकार देणाऱ्या नवऱ्याला बायकोने जंगलात नेऊन जाळले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

Priya More

Summary -

  • शहापूरमध्ये बायकोने नवऱ्याची हत्या केली

  • जंगलात नेऊन नवऱ्याला जाळून टाकले

  • घटस्फोट द्यायला नवऱ्याने नकार दिल्याने तिने हे कृत्य केले

  • मुख्य आरोपी महिलेने तिघांच्या मदतीने ही हत्या केली होती.

फैय्याज शेख, शहापूर

घटस्फोट द्यायला नकार दिल्यामुळे बायकोने नवऱ्याची जंगलात नेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहापूरजवळ मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या जंगलात या व्यक्तीचा मृतदेह आढळला. नवऱ्याला जंगलात नेऊन त्याला जाळून टाकलं होतं. १७ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. पोलिसांनी कसून तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोट देण्यास नकार देण्याऱ्या नवऱ्याची बायकोने हत्या केली. महिलेने जंगलात नेऊन नवऱ्याला संपवलं. ही घटना मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शहराजवळील चेरपोली गावाच्या परिसरात १७ नोव्हेंबरला घडली होती. या घटनेचा उलगुडा आता पोलिसांनी केला असून मारेकरी महिला आणि तिच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तिपण्णा हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा कर्नाटकचा होता. तर हसीना मेहबुब शेख असं आरोपी महिलेचे नाव आहे. घटस्फोट देत नसल्यामुळे हसीनाने तिपण्णाची हत्या केली. नवऱ्याची हत्या करण्यासाठी या महिलेला तिघांनी मदत केली होती. फैयाज जाकीर हुसेन शेख, सिकंदर बादशहा मुजावर आणि गुलाम अकबर इक्तीयार मौलवी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.

मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर शहरालगतच्या चेरपोली गावाच्या हद्दीत अर्धवट जळलेल्या आणि कुजलेल्या स्थितीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्हाची उकल करण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या नवरा बायकोमधील घरगुती वादातून करण्यात आल्याचे उघड झाले. बायको नवऱ्याकडून घटस्फोटाची मागणी करत होती. मात्र नवरा घटस्फोट द्यायला नकार देत होता. त्यामुळे बायकोनं त्याची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

Maharashtra Live News Update: नाशिक -पुणे महामार्गावर गेल्या एक तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

Indigo Airlines: २४ तासांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द, इंडिगोच्या प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Mumbai Pune Highway : मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी एकाच रिक्षात कोंबले; थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT