Dombivli Crime Saam Tv
क्राईम

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Dombivli Crime: डोंबिवलीमध्ये पाण्यावरून झालेल्या वादात तरुणाने सुरक्षारक्षकाची हत्या केली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary:

  • डोंबिवलीत पाण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाची हत्या

  • विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला

  • अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील धक्कादायक घटना

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवलीमध्ये सुरक्षारक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली. नळ चालू ठेवून पाणी वायाला घालवण्यावरून वाद झाला. या रागातून एका तरुणाने सुरक्षारक्षकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत नळ चालू करून पाणी वाया का घालवतोस? यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवलीतील कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे घडली. या घटनेमध्ये सुरक्षारक्षक उमेश वाघ यांचा मृत्यू झाला. या प्ररकरणी डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी आरोपी अक्षय जाधवला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवले जात असल्याने सुरक्षारक्षकाने त्याबाबत जाब विचारला. यावरून सुरक्षा रक्षक उमेश वाघ आणि अक्षय जाधव यांच्यात वाद झाला. वाद वाढत जाऊन अक्षय जाधवने रागाच्या भरात सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी अक्षय जाधवला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. न्यायालयाने अक्षयला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास विष्णूनगर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT