UP Crime News Saam Digital
क्राईम

Up Crime News : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, घटना CCTVमध्ये कैद

Up Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये संतापजनक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Up Crime News

उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. मथुरामधील एका शाळकरी मुलीवर तिच्या शाळेतील शिक्षकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व घटना शाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. वारंवार मुलीच्या घरातील तिला शाळेत जाण्यास सांगत होते, परंतु ती शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. पालकांना देखील आपल्या मुलीच्या वागण्यात काहीतरी खटकत होतं. घरातील सदस्यांनी तिला शाळेत जात नसल्याचे कारण विचारलं. मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोसिकला पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली आहे. शिक्षकाने शाळेतच विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलगी वर्गात आली त्यावेळी आरोपी शिक्षक वर्गात कपडे काढून समोर उभा होता. काही अंतरावर उभ्या असणाऱ्या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीला जवळ खेचून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने स्वत:चा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरोपी शिक्षकासमोर सुटकेसाठी विनवणी देखील केली. मात्र शिक्षकाच्या डोक्यात भलतक काहीतरी सुरु होतं. आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्या मुलीला अॅसिड हल्ला करत जाळण्याची धमकीही त्याने दिली. मात्र कशीबशी विद्यार्थिनीने शिक्षकाच्या तावडीतून आपली सुटका केली.

घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. संबंधित आरोपी सध्या फरार असून पोलिसांचे पथक या आरोपीच्या शोधात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childrens Day Special: आईबाप भारी अन् लेकरं त्यांच्यापेक्षाही लयभारी! या बॉलिवूड कलाकारांची मुलं सोशल मीडियावर आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates : भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला

Tulsi Health Benefits: रिकाम्या पोटी तुळशीचे पान खा आणि अनेक आजारांना दूर पळवा

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रूट ठरेल 'या' आजारांवर फायदेशीर

Nandurbar News : तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्र्यांवर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी; ३५ उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास

SCROLL FOR NEXT