संभाजी थोरात, साम टीव्ही
सातारा : पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना कार चालकास गाडी थोडी मागे घे म्हटल्याच्या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ करत मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कराड शहराजवळील मलकापूर येथे पोलीस आणि कारचालकाच्या झालेल्या वादावादीचं रूपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झालं. कारचालकासह त्याच्या पत्नीने आणि अन्य दोघांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मारहाण करणाऱ्या कारचालकाचं नाव शुभम अरुण भोसले (रा.कोल्हापूर) असं असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव ब्रह्मादेव माने असं आहे. पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी कारचालकास गाडी थोडी मागे घेण्यासाठी सांगितल्याने पोलीस कॉन्स्टेबलला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन 'रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, मी गाडी मागे घेत नसतो', असं म्हणाला.
कारचालक शुभम अरुण भोसले याने खाली उतरुन 'तू पुढे कसा जातोस ते बघतोच', असं म्हणून पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली, आणि पुन्हा गाडीत बसत असताना कार चालक शुभम अरुण भोसलेची पत्नी आणि गर्दीतील दोन अनोळखी इसम यांनी कॉन्स्टेबलचा हात धरुन गाडीतून खाली खेचत हात पिरगळून खाली पाडलं. त्यावेळी कारचालक शुभम भोसले आणि त्याच्या पत्नीने डोक्यावर, कानावर हाताने मारहाण केल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणून मारहाण करुन दुखापत केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबलने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.