Sassoon Hospital  Saam TV
क्राईम

Sassoon Hospital : आयसीयूमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचां गंभीर आरोप

Pune News : सागर रणुसे असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. १५ तारखेला दुचाकी चालवत असताना सागरचा अपघात झाला होता. १७ मार्च रोजी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरूच होते.

Ruchika Jadhav

Pune :

पुण्यातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णातील एका रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झालाय, असा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास देखील नातेवाईकांचा नकार दिला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर रुग्ण ससून रुग्णालयातील आयसीयू विभागात काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याचा आज मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर यासाठी गंभीर आरोप केले असून रुग्णालयाने मात्र हा दावा फेटाळून लावलाय.

सागर रणुसे असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. १५ तारखेला दुचाकी चालवत असताना सागरचा अपघात झाला होता. १७ मार्च रोजी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरूच होते. तसचं २५ तारखेला त्याच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सागरला आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती ढासळत गेली आणि मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज संपली.

नातेवाईकांनी आयसीयूमध्ये सागरला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे. मात्र नातेवाईकांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT