Sangli Crime Saam Tv
क्राईम

Sangali Crime News: धक्कादायक! एकाच महाविद्यालयातील 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

Minor Students Ends Life : सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आलीय. एकाच महाविद्यालयातील 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्या आहेत. या प्रकरणांमुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Minor Girl End Her Life In Sangli

गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसत आहेत. या नैराश्यातून ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. असाच धक्कादायक प्रकार सांगलीतून समोर आलाय. (latest crime news)

काल (sangli) कुपवाडच्या बामणोली येथे महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरुन 16 वर्षीय विद्यार्थिनीनं उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर आज मिरजेत भाड्याच्या घरात राहत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सांगलीच्या कुपवाड येथील बामणोली मधील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळं शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पालकांंसमोरच तिने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली होती. पालकांसमोरच हा सर्व प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

उपचारादरम्यानच झाला मृत्यू

दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्यामुळं ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गंभीर जखमी झाली होती. शाळा प्रशासनाने व तिच्या पालकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केलं.

डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्राव झाल्यानं उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. अजून या विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केल्या, हे स्पष्ट झालं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT