Crime News Saam TV
क्राईम

Sangli Crime: सांगली जिल्हा हादरला! प्रेमप्रकरणातून मारहाण, मुलाच्या वडिलांचा मृत्यू; ७ जण अटकेत

Shirala Crime: सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई- वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.

विजय पाटील

Sangli Shirala Crime News:

सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई- वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेने सांगली जिल्हा हादरुन गेला असून मारहाणीप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सात जणांना अटक करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील (Sangli) शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधांतून मुलाच्या आई वडिलांना मुलीचे आई वडील, चुलत चुलते तसेच नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. याच रागातून दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत पोलला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT