Paithan Crime Saam tv
क्राईम

Paithan Crime : लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून; पैठण शहरातील घटना

Sambhajinagar News : नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि (Sambhajinagar) डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण (Paithan) शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे (Crime News) लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा रोज पोहचवून देत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला. यानंतर ते निघून गेले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोंडावर फावड्याने वार 

वडील जेवणाचा डबा घेऊन गेल्यानंतर अज्ञाताने कृष्णा डोळस याच्या तोंडावर व डोक्यावर लोखंडी फावड्याने प्रहार करून त्याचा खून केला. हि घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT