Pune News : सकाळ-संध्याकाळी वॉकसाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! २ घटनांमुळे पुण्यात खळबळ  Saam Tv
क्राईम

Pune News : सकाळ-संध्याकाळी वॉकसाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! २ घटनांमुळे पुण्यात खळबळ

Pune : चोरीच्या दोन घटनामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या महिला आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून लुबाडले जात आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून या घटना वाढल्या आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोरी हा नित्याचाच भाग ठरलाय. पुण्यात मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांना चोरट्यांनी लुबाडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एका ठिकाणी मंगळसूत्र लंपास केलं, तर दुसऱ्या ठिकाणी गळ्यातील चैन हिसकावली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांनो सावधान राहा, असेच म्हणायची वेळ आली.

पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज समोर आलेय. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६.४२ वाजता ही घटना घडली. ज्येष्ठ महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे पण शक्य नव्हते.

नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्‍या जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र चोरून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता याठिकाणी व्यक्त होत आहे. पोलिसांकडून काय पावले उचलली जाणार? याबाबत चर्चा सुरू आहे.

दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली. सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी महिलेची सोन्याची चैन हिसकावली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागातील डी पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटी मध्ये ही घटना घडली. एक दाम्पत्य सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

SCROLL FOR NEXT