Panvel News Saam Tv
क्राईम

Shocking : पनवेल हादरलं! मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्...

Panvel Farm House News : पनवेलमधील फार्महाऊसमध्ये महिलांचे गुप्तपणे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा बसवून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ तयार करणाऱ्या मॅनेजरला रंगेहात पकडले आहे.

Alisha Khedekar

पनवेलमधील रियान्स फार्महाऊसच्या बाथरूममध्ये महिलांचे चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड

आरोपी मॅनेजर मनोज चौधरी याला महिलांनी रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले

स्पाय कॅमेरा वापरून अंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ तयार केले

या घटनेनंतर फार्महाऊस आणि रिसॉर्टमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

तुम्हीसुद्धा फार्महाउस, रिसॉर्ट सारख्या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा राहण्यासाठी जात असाल तर सावधान! कारण पनवेल मधून धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून अश्लील चित्रण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील धानसर येथील रियान्स फार्म हाऊसवर २५ ऑक्टोबर रोजी काही महिला फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यादिवशी रात्री दोनच्या दरम्यान धानसर गाव येथील रियान्स फार्म हाऊस येथील मॅनेजर मनोज चौधरी यांनी बाथरूम मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरले आणि स्पाय कॅमेरा बसवून महिला बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी गेले असता त्यांचे व्हिडिओ शूटिंग केली.

महिलांची ही बाब लक्षात आली असता त्यांनी आरोपीला अद्दल शिकवण्याचे ठरवले. आरोपीचा मागोवा घेत असताना यावेळी स्पाय कॅमेरावरून अश्लील चित्रण करत असताना आरोपीला महिलांनी रंगेहाथ पकडले. घडलेल्या घटनेबाबत घाबरून न जाता महिलांनी आरोपीशी दोन हात करत पोलिसांना माहिती दिली.

तळोजा पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मनोज चौधरी याला अटक केली असून महिलांचे गुप्तपणे चित्रीकरण करण्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून आरोपीने यापूर्वी देखील असा प्रकार केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान तुम्हीदेखील अशाप्रकारे फार्म हाऊसवर राहायला जात असाल तर तुम्ही सुरक्षित आहात का ? याची खात्री करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT