Rashmika Mandanna Deepfake Video Saam Tv
क्राईम

Rashmika Mandanna: रश्मिकाचा DeepFake व्हिडीओ का केला होता शेअर? आरोपीने सांगितलं धक्कादायक कारण

Rashmika Mandanna Deepfake Video: काही दिवसांपू्र्वी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीनं यामागील कारण सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rashmika Mandanna News

आजच्या डिजीटल युगात तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपली कामे सोपे होत आहेत, तितकाच त्याचा गैरवापरही केला जातोय. अनेक लोकं स्वतःचे हेतू पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. (latest entertainment news)

आजकाल प्रत्येकाचे आयुष्य सोशल मीडियावर सुरू होते आणि संपते. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक वेळा लोकं चुकीच्या गोष्टी करतात, याचे त्यांना मोठे परिणाम भोगावे लागतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडिओ (Rashmika Mandanna Deepfake Video) प्रकरण आहे. यातील मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपीने मोठा खुलासा झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फॉलोअर्स वाढविण्यासाठी घातला घाट

या प्रकरणातील (Deepfake Video) आरोपीचं नाव नवीन असं आहे. तो २४ वर्षीय डिजिटल मार्केटिंगचा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो रश्मिका मंदान्नाचे फॅन क्लब पेज चालवतो. ज्याचे ९० हजार फॉलोअर्स आहेत.

आरोपीने सांगितलं की, त्याला या पेजवर फॉलोअर्सची संख्या वाढवायची होती. पेजवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ अपलोड केला. आरोपीने सांगितले की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर फॅन पेजला लगेचच २ आठवड्यात १०८,००० फॉलोअर्स मिळाले.

पोलिसांनी अटक केली

जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला, त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने स्वतः याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO युनिटने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी ५०० हून अधिक सोशल मीडिया खात्यांचा शोध घेतला. देशभरातील सोशल मीडिया धारकांची चौकशी (Rashmika Mandanna News) केली.

डीपफेक व्हिडिओची सायबर लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. तपासात असं दिसून आलं की, मूळ व्हिडिओ ९ ऑक्टोबर २०२३ रोजी एका ब्रिटिश भारतीय मुलीने अपलोड केला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिट IFSO ने आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलीय, अशी माहिती न्युज२४ च्या वृत्ताने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT