Thief stuck in an exhaust fan hole during a failed robbery in Kota, Rajasthan. saam tv
क्राईम

Thief Video: चोरीसाठी एक्झॉस्ट फॅनच्या होलमध्ये घुसला, नंतर जीव वाचवण्यासाठी चोराच्याच विनवण्या; व्हिडिओ व्हायरल

Thief Stuck In Exhaust Fan Hole : कोटामधील एका चोराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एक्झॉस्ट फॅनच्या होलमधून घुसण्याचा प्रयत्न करणारा चोराला पोलिसांनी वाचवलं.

Bharat Jadhav

  • कोटा शहरात चोरीचा अजब प्रकार समोर आला

  • एक्झॉस्ट फॅनच्या होलमधून चोर घरात शिरत होता

  • पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोराला वाचवले.

कोटा येथील घरातून चोरी करण्यासाठी गेलेल्या एका चोराला चांगलेच महागात पडले.चोरी करण्यासाठी घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागला पण तो तेथेच अडकून पडला. त्याच कारण ठरलं तो घरात एका एक्झॉस्ट फॅनच्या होलमधून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्या होलमध्येच अडकल्यानंतर तोच घरातील लोकांना आवाज देत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी विनवण्या करू लागला.

"अस्मान से गिरे और खजूर पे लटके" ही म्हण तुम्ही कदाचित ऐकली असेल. राजस्थानच्या कोटा येथील घटनेमुळे ही म्हण अनेकांच्या तोंडी परत आली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरात हात साफ करण्याच्या उद्देशाने एक्झॉस्ट फॅनच्या होलमधून घरात घुसऱ्याला चोराला देव आठवला. एग्जॉस्ट फॅनच्या होलमध्येच अडकल्यानं त्याचा चोरीचा प्लॅन फसला. त्याला बाहेरही पडता येत नव्हतं ना घरात जाता येत होतं. शेवटी त्या घरातील लोकांना पोलिसांना बोलवून त्यांनी त्याला त्या होलमधून बाहेर काढला.

कोटा येथील रहिवासी सुभाष कुमार रावत म्हणाले की, ते आणि त्यांची पत्नी ३ जानेवारी रोजी खाटू श्याम मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. ते ४ जानेवारीच्या रात्री घरी परतले. त्यावेळी दोन चोर त्यांच्या घरात शिरत होते. त्यातील एक जण हा एक्झॉस्ट फॅनच्या होलमध्ये घुसला होता, तर दुसरा खाली उभा होता. सुभाष कुमार हे जेव्हा त्यांची बाईक घराच्या अंगणात पार्क करत होते त्यावेळी बाईकच्या उजेडात त्यांना दोन जण दिसले.

त्यांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. त्यावेळी एकजण पळून गेला. पण दुसरा जो एक्झॉस्ट फॅनच्या होलमध्ये शिरला होता तो त्यात अडकला. आरडा-ओरडा ऐकून शेजारी जागे झाले आणि घरात घुसले आणि चोराला रंगेहात पकडले. स्थानिकांचे म्हणणे आहे की या परिसरात दररोज संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसतात. या प्रकरणी बोरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

पोलिसांच्या या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक रहिवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात की त्यांनी वारंवार पोलिसांना परिसरात गस्त घालण्याचे आवाहन केले आहे, परंतु तरीही पोलिसांची वाहने येत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

SCROLL FOR NEXT