JODHPUR LIVE-IN RELATIONSHIP CASE: WOMAN ACCUSES COUSIN OF ASSAULT Google
क्राईम

Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

Rajsthan Crime News : जोधपूरमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने चुलत भावावर जबरदस्ती आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • जोधपूरमध्ये लिव-इन रिलेशनशिपमधील धक्कादायक प्रकरण उघड

  • महिलेने चुलत भावावर गंभीर अत्याचाराचे आरोप केले

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

राजस्थानातील जोधपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खांडा फलसा पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेने आपल्या चुलत भावाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या पतीपासून वेगळी राहत असून मागील सुमारे दोन वर्षांपासून जोधपूरमध्ये भाड्याच्या घरात आपल्या चुलत भावासोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दरम्यान, आरोपी देखील आपल्या पत्नीसोबत राहत नसल्याचे समोर आले आहे.

महिलेचा आरोप आहे की, एकत्र राहत असताना आरोपीने तिच्यावर अनेक वेळा जबरदस्ती केली आणि तिला सतत मानसिक त्रास दिला. या प्रकारामुळे ती तणावाखाली होती. अखेर त्रास असह्य झाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार करताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू असून दोन्ही बाजूंची सविस्तर जबाब नोंदवली जाणार आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची भूमिका, तसेच महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता तपासली जात आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे लिव-इन रिलेशनशिपमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून महिलांनी अशा परिस्थितीत कायदेशीर मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, यावरही भर दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

अखंडित काँग्रेस उभी राहणार? ज्येष्ठ नेत्याला साद, भाजपचं टेंशन वाढणार?

आता म्हातारपण येणार नाही? माणूस देणार मृत्यूला हुलकावणी?

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा; भाजपची गेमचेंजर मागणी, महापालिका काय निर्णय घेणार?

म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणावरून राजकारण फिरलं? दिग्गज नेत्याची विधानपरिषद निवडणुकीतून अचानक माघार, बंद दाराआड काय ठरलं?

SCROLL FOR NEXT