Wife kills husband for job : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे दीपक कुमार हत्याकांड प्रकरणा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. दीपकचा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे, त्याच्या पत्नीने केलाय. दीपक रेल्वेमध्ये कामाला होता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर नोकरी आपल्याला मिळेल. नंतर प्रियकरासोबत आयुष्य व्यवस्थित जगता येईल. त्यामुळे शिवानीने पती दीपकचा काटा काढला, अन् हार्टअटॅक आल्याचे सांगितले. पण पोलिसांच्या तपासात शिवानीच दोषी असल्याचे समोर आले. दीपकची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवानीला बेड्या ठोकल्या आहेत.
दीपकला गेल्या काही दिवसांपासून पत्नी शिवनीवर संशय होता. दीपक आणि शिवानी यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत होती. शिवानीने आपल्या रेल्वे कर्मचारी असलेल्या पती दीपकला ठार मारण्याचा कट रचला. दीपक याची नोकरी मिळवून प्रियकरासोबत सुखाने जगायचं होतं. नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर दीपक याचा गळा दाबून खून केला आणि शिवानीने घरच्यांना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. पोस्टमॉर्टम अहवालाने शिवानीचे बिंग फुटले.
रिपोर्ट्सनुसार, मृत दीपक कुमार हा नजीबाबाद रेल्वे स्थानकात कारखाना आणि वॅगन विभागात तांत्रिक कर्मचारी म्हणून कामाला होता. दीपक याचा खून केल्यानंतर पत्नी शिवानीने हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण सांगितले.मात्र, दीपकच्या कुटुंबियांना संशय आला अन् पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मृतदेह पुन्हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शिवानीचे बिंग फुटले. दीपक याची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी शिवानीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
चौकशीदरम्यान शिवानीने गुन्ह्याची कबुली दिली. दीपकच्या मृत्यूनंतर त्याची सरकारी नोकरी मिळवायची होती. या हेतूने दीपकला नाश्त्यातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. तो बेशुद्ध झाल्यावर गळा दाबून दीपकची हत्या केली, असे शिवानीने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले. दीपकच्या हत्याची बातमी समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.