Husband Killed Wife  Saam tv
क्राईम

Husband Killed Wife : जेवण बनवलं नसल्याने रागाच्या भरात नवऱ्याने बायकोला संपवलं, परिसरात खळबळ

Saam Tv

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : रायगडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या पेणमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्या आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या पेणमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली. बायकोने जेवण बनवलं नाही, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. नवऱ्याने बायकोची भिंतीवर आपटून निर्घृण हत्या केली.

४५ वर्षीय भारती गोपीनाथ वाघमारे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ४० वर्षीय गोपीनाथ विष्णू वाघमारे याच्या विरोधात पेण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती गोपीनाथ वाघमारे याला अटक केली आहे.

सासू-सासऱ्याने केली जावयाची हत्या

कोल्हापुरात जावयाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. मुलीला दारू पिऊन त्रास देत असल्याने जावयाची सासू-सासऱ्याची गळा आवळून हत्या केली. धावत्या एसटी बसमध्येच सासू-सासऱ्याने जावयाची हत्या केली.

सासू-सासऱ्याने जावयाची हत्या केल्यानंतर मध्यरात्री बसमधून मृतदेह आणून बस स्थानकात ठेवला. जावई संदीप शिरगावे याच्या हत्येची उकल पोलिसांनी केली. काही दिवसांपूर्वी सकाळी बसस्थानक परिसरात मृत्यूदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

पुण्यातील कात्रजमध्ये अनैतिक संबंधातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना घटना घडली. पतीचा खून केल्यानंतर महिलेने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. परंतु महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

Team India Announced: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT