रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २७ सप्टेंबर
Rajaram Sakhar Karkhana Varshik Sabha: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण आज पार पडत असून कसबा बावडा येथील कारखाना कार्यस्थळावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुत्र अमल महाडिक यांची सत्ता आहे तर विरोधात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट आहे. त्यामुळे या सभेत महाडिक गट विरुद्ध बंटी पाटील असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो अशातच या सभेआधी महाडिक गटाने बॅनरबाजी करत सतेज पाटील यांना डिवचलं आहे.
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेआधी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारखाना सभास्थळाबाहेर सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्या गटाने परस्पर विरोधी बॅनरबाजी केल्याने नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. सभेच्या प्रवेशद्वाराजवळच सतेज पाटील गटाच्या सभासदांनी सतेज पाटील यांची प्रतिमा असणारे डिजिटल फलक घेऊन उभे आहेत. तर या परिसरात अमल महाडिक यांच्या सभासद कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात अनेक बॅनर्स उभे केलेले आहेत.
महाडिक गटाने उभे केलेल्या या बॅनरमध्ये कोजेनाचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय, असा मजकूर लिहल्याचं दिसत आहे. तसेच जे बोललो ते करुन दाखवलं, असे म्हणत महादेवराव महाडिक यांचे फोटो असलेले फ्लेक्सही झळकावण्यात आले आहेत. दुसरीकडे सतेज पाटील यांच्या समर्थकांकडूनही त्यांचे फोटो असलेले पोस्टर्स दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे एकूणच राजाराम कारखान्याची सभा चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राजाराम कारखान्याच्या सत्तारूढ गटाने कारखान्यात सहवीज प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले आहे. कारखान्यांवर आताच मोठे कर्ज असल्याने हा प्रकल्प कारखान्याला आर्थिक खाईत घालणारा असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. दरम्यान कारखान्यावरील कर्जाची माहिती विरोधकांनी दिली आहे. तरीही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत. त्यामुळे गोंधळाची परंपरा कायम ठेवतात का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.