raigad crime news Saam tv
क्राईम

Raigad Shocking News: नववर्षाच्या आधी पोलिसांची मोठी कारवाई; रायगडमध्ये 1500 किलो स्फोटकांचा साठा जप्त

Raigad latest crime news in Marathi: नववर्षाच्या आधीच रायगडमधील माणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनधिकृतपणे स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत केले आहेत.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

Raigad News:

वर्षातील शेवटचा आठवडा आणि नाताळची सुटी लागून आल्याने कोकणात पर्यटकांची झुंबड कोकणात पाहायला मिळत आहे. रायगडमध्येही ही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रायगडमधील विविध भागात अनेक व्यावसायिकांनी नववर्षांची तयारी सुरु केली आहे. या नववर्षाच्या आधीच रायगडमधील माणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनधिकृतपणे स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत केले आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांकडून जिवंत जिलेटीन 70 किलो डेटोनेटर हस्तगत

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्पोटके जप्त करण्यात आले आहेत. माणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अनधिकृतपणे स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यास पोलिसांनी यश आलं आहे.

पोलिसांनी या कारवाईत स्फोटकांसह तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. स्फोटके पुण्यातून रायगड जिल्ह्यात आणताना माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पहिली पसंती रायगडला मिळाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन पर्यटकांनी गजबजलं आहे. रायगडमधील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, समुद्र किनारा हाऊसफुल झाले आहेत. यामुळे रायगडमधील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT