Raigad crime Saam Tv
क्राईम

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Raigad Crime: रायगडमध्ये २४ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. लोणेरे येथील एका लॉजमध्ये तिचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

Summary -

  • लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

  • धारदार शस्त्राने वार करून तरुणीची हत्या केली

  • निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

  • पोलिसांनी काही तासांत आरोपीला केली अटक

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

रायगडच्या लोणेरे येथील एका लॉजवर एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. लॉजमधील एका खोलीत निर्वस्त्र अवस्थेतील या मुलीचा मृतदेह रविवारी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेतला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. रायगड, रत्नागिरी आणि नवी मुंबई पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी मोरे (वय २४ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव होते. पल्लवी रायगडच्या वडगाव येथे राहणारी होती. लोणेरे येथील एका लॉजच्या खोलीमध्ये पल्लवीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने डोक्यात आणि शरीरावर वार करत तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रायगड पोलिसांनी फिंगर प्रिंट एक्सपर्ट, डॉक्स क्सॉड, फॉरेन्सिक पथकामार्फत तपास कामाला सुरुवात केली.

लॉजमध्ये मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृत तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तरुणीच्या हत्येप्रकरणी माणगावच्या गोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये तरुणीची हत्या, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि नवी मुंबई पोलिसांमार्फत स्वतंत्र टीम तयार करत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी योग्य तपास करून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केली.

पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर माणगाव बंद करून आंदोलन केले जाईल असा इशारा बौद्ध समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, लोणेरे येथील तरुणीच्या हत्येप्रकरणी मंत्री आदिती तटकरे यांनी मध्यरात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आरोपीला अटक केल्याचे जाहिर केले. मात्र पोलिस आरोपीच्या अटकेबाबतची माहिती लपवताना दिसत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांच्या पोस्टच्या १२ तांसांनंतर देखील आरोपीची अटक पोलिस का लपवत आहेत? असा प्रश्ना आता स्थानिक पातळीवर विचारला जात आहे.

हत्या झालेल्या मुलीच्या बहिणीने सांगितले की, 'सकाळी ११ वाजता ती घराबाहेर पडलं. त्यानंतर तिचा फोन आला नाही. मी अनेक वेळा तिला फोन केले पण तिने फोन उचलला नाही. रात्री पोलिसांचा फोन आल्यावर कळाले की असे झाले. ज्याने कुणी तिच्यासोबत असं केलं आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. अनिशसोबत ती बोलत होती. त्यानंतर ती पुण्याला निघून गेली. भाभीने मला बोलावले आहे. तिच्या घरी कार्यक्रम आहे. पण ती तिथे गेली नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT