Punjab Crime  Saam Tv
क्राईम

Crime: आठवीच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडीओ बनवला अन् व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला

Punjab Crime: पंजाबमध्ये आठवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. वर्गमित्राने आपल्या ३ मित्रांसोबत हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. यामध्ये पीडितेच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.

Priya More

Summary -

  • मोहालीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

  • पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक

  • पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

  • आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती

पंजाबमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या विद्यार्थिनीच्या वर्गमित्राने ३ मित्रांसह हे भयंकर कृत्य केले. आरोपींनी व्हिडीओ तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला. पंजाबच्या मोहालीमध्ये ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. आरोपींमध्ये पीडित मुलीच्या मैत्रिणीचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिच्याच वर्गमित्राने आपल्या मित्रांसोबत मिळून अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर तिच्या वर्गमित्राने आपल्या मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मोहालीच्या न्यू चंदीगड परिसरात घडली. आरोपींनी पीडितेवर बलात्कार करताना त्याचा व्हिडीओ तयार केला आणि तो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केला. यावेळी आरोपींनी विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या वर्गमित्रासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पीडित विद्यार्थिनीचा वर्गमित्र आणि त्याचे दोन्ही मित्र अल्पवयीन आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर एका २० वर्षीय आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस) ७०(२), ६१(२) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीच्या एका अल्पवयीन मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनीला आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत केल्याचा आरोप या मुलीवर आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित विद्यार्थिनी १५ वर्षांची असून ती आठवीत शिकते. मुख्य आरोपी तिचा वर्गमित्र आहे. ज्याने आधी पीडित विद्यार्थिनीशी मैत्री केली आणि नंतर तिचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवून तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या ३ मित्रांसोबत मिळून पीडितेवर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला वेगवेगळ्या निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी पीडितेसोबत हे भयंकर कृत्य करत होते.

आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते तिला सतत निर्जन ठिकाणी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत होते. बदनामीच्या भीतीने पीडिता कोणालाही काहीही सांगू शकली नाही. पण जेव्हा आरोपींपैकी एकाने तो व्हिडिओ एका खासगी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर केला तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल आपल्या कुटुंबीयांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांनाही अटक केली. तसंच पीडितेच्या मैत्रिणीला देखील अटक केली. या घटनेमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऋषी वैद्य वर जादूटोणा कायद्याचे कलम लावा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

BJP victory Maval: मावळच्या राजकारणात ट्विस्ट! स्पष्ट बहुमत असूनही राष्ट्रवादीचा पराभव, बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

Women Hydration Tips: डिहायड्रेशनचा त्रास होतोय? कामाला जाणाऱ्या महिलांनी आत्ताच या टिप्स फॉलो

EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ATM आणि UPIद्वारे काढता येणार PF; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT