Pune News Saam Tv
क्राईम

Pune Dog News : लाकडी फळीने आणि दगडाने कुत्र्याला मार मार मारलं, पुण्यातील संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Pune News : पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीत पाळीव सायबेरियन हस्की श्वानावर निर्दयी हल्ला झाला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. शिवाय कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • आकुर्डीत पाळीव सायबेरियन हस्कीवर निर्दयी हल्ला

  • सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; प्राणिप्रेमींमध्ये संताप

  • निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

  • प्राणीसंवर्धन संस्था आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातून प्राण्यांवरील क्रूरतेची संतापजनक उघडकीस आली आहे. आकुर्डी परिसरातील डीटूसी कमर्शियल शोरूमसमोर २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी एका पाळीव श्वानाला जीवघेणी मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याचा साथीदार यांनी पाळीव सायबेरियन हस्की या महागड्या आणि लोकप्रिय प्रजातीच्या श्वानावर लाकडी फळी आणि दगडाचा वापर करून निर्दयतेने हल्ला केला. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच प्राणिप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची भावना पसरली. यासंदर्भात राहुल सदाशिव मानकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेवरून अनेक प्राणीसंवर्धन संस्था पुढे आल्या असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. प्राण्यांवर होणाऱ्या अशा अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशीही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून आरोपींना लवकरात लवकर पकडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राण्यांवरील क्रूरतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून समाजात या संदर्भात अधिक जनजागृती होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair: शरीरातील कोणत्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात?

OBC Reservation : ओबीसीत एकही नकली व्यक्ती सामाविष्ट होणार नाही; CM देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या बारामतीत येणार, पोलिस ठाण्यात होणार हजर

Maharashtra Politics: भरत गोगावले यांच्या हक्कभंग आरोपावर अनिकेत तटकरे यांचे प्रत्युत्तर|VIDEO

Mumbai-Pune Tourism : रोड ट्रिपसाठी मुंबई-पुण्याजवळील स्वर्गाहून सुंदर ठिकाण, आयुष्यभर आठवणीत राहतील क्षण

SCROLL FOR NEXT