Crime News Latest News SAAM TV
क्राईम

Pune Crime : हुंडा दिला नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; ६ जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पुण्यात पतीने हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून गॅलरीतून ढकलण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांवर चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात हुंड्यासाठी पतीने पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सासू, सासऱ्यांसह पतीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील चंदनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीचा प्रणिल याच्याशी ऑक्टोबर २०२४ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर हुंड्यात काही वस्तू दिल्या नाहीत, त्यासाठी आई वडिलांकडून पैसे घेऊन ये असे पती प्रणिल याने तिला सांगितले. हुंडा दिला नाही म्हणूनपती, सासू, सासरे, चुलत सासरे यांनी तिला टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक छळ देण्यास सुरुवात केला. त्यानंतर २५ जूनला पती प्रणिलने तिला मारहाण करत तिचा गळा दाबला. तसेच तिचा मोबाईल देखील फोडला आणि फरफटत नेत घराच्या गॅलरीमधून ढकलून देण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने मोठा अनर्थ टळला. पीडितेने तक्रार नोंदवल्याप्रमाणे कुटुंबातील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT