Crime News in Marathi 
क्राईम

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! निरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

Crime News in Marathi : पुणे पुन्हा हादरले आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीचा हातपाय बांधून पोऱ्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News Update : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. निरा नदीच्या पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली नदी पात्रात पोत्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीचा हातपाय बांधून पोऱ्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरूवात केला आहे. प्राथमिक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर व्रण असून उजव्या हातावर "ओम" कोरलेले आहे. पुणे सातारा महामार्गावरील नसरापूरच्या राजगड पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मयूर निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरूष जातीच्या सुमारे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळा दाबून खून केला. त्यानतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हात व पाय बांधून त्यास पांढरे पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालून निरा नदी पात्रात फेकून दिले आहे, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT