Pune Police  Google
क्राईम

Pune Police: 'आम्ही पुण्याचे बॉस...पुणे किंग...'; ते रील स्टार पोलिसांच्या रडारवर

Pune Police Action On Reels : गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रिल्स बनवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी तंबी दिलीय. गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स स्टार वर पोलिसांचे लक्ष असून आज सकाळपासून पुणे पोलीस आयुक्तालयात असे रिल्स बनवणाऱ्यांना बोलवून इशारा दिला जातोय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलत आहे. यादृष्टीकोनातून पोलीस रिल्सस्टार नजर ठेवून आहेत. गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रिल्सवर कारवाई करत असून रिल्स बनवून गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी तंबी दिलीय. पुणे पोलीस आयुक्तालयात आज सकाळपासूनच गु्न्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रिल्स स्टार्सला बोलवून इशारा दिला जातोय.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. विद्येचे माहेर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढू लागलीय. मागील आठ महिन्यांत शहरात तब्बल ६५ जणांचे खून झाले. तर ९९ जणांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यात. यावर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस कठोर पावले उचल आहे.

रिल्सद्वारे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्सस्टार्सला सकाळपासून पोलीस तंबी देत आहेत. 'आम्ही पुण्याचे बॉस, पुणे किंग, पुण्याचे मालक', असे कॅप्शन देऊन गुन्हेगारीचा प्रसार करणाऱ्यांना पोलिसांनी इशारा दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात आज सकाळपासून असे रिल्स बनवणाऱ्यांना बोलवून त्यांना इशारा दिला जातोय. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक तरुणांकडून गुन्हेगारीचे उदात्तीकरण होणारे रिल्स अपलोड केले जात आहेत. त्यावर पोलिसांकडून वचक बसवला जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढलीय. मागील आठ महिन्यांत शहरात तब्बल ६५ जणांचे खून झाले. तर ९९ जणांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्यात. दिवसेंदिवस पुणे शहराच्या आकाराच्या तुलनेत लोकसंख्या देखील वाढत आहे. नोकरीनिमित्ताने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातूनच गुन्हेगारी देखील वाढू लागलीय. किरकोळ कारण, अनैतिक संबंध, वर्चस्ववाद, प्रेमसंबंध अशा कारणांमुळे खून प्रकरण वाढत असल्याचं दिसत आहे. तर २०२३ मध्ये शहरात १०२ खुनांच्या तर २३९ खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या. ऑगस्ट २०२४ अखेर ५९ जणांचे खून झाले. तर १४४ जणांवर खुनी हल्ले झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT