Pune Latest Crime News Saam TV
क्राईम

Pune News: पुण्यातील ट्रेनिंग सेंटरमध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा, संतापजनक घटना

Pune Crime News : कामावर येताना डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचे, असं म्हणत पुण्यातील एका ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने तरुणीचा विनयभंग केला.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

कामावर येताना डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचे, असं म्हणत पुण्यातील एका ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने तरुणीचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर तिच्यासोबत जवळीकही साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेश (वय ५१) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, कोथरूड परिसरातील एका ट्रेनिंग सेंटरमध्ये ८ मे ते १४ मे या कालावधीत हा प्रकार घडला.

तक्रारदार तरुणी कोथरूड येथील एका ट्रेनिंग सेंटर येथे नोकरी करत होती. ८ मे रोजी आरोपी हा तरुणीजवळ आला. आपल्या कंपनी मध्ये येताना "डीप नेक व शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का?" असा जाब कनेरी यांने तरुणीला विचारला.

इतकंच नाही, तर तिला दमही भरला. आरोपीने तरुणीला त्याच्यासोबत बाहेर मीटिंग करण्यासाठी येशील का? अशी मागणी देखील घातली. दुसऱ्या मुलीही माझ्यासोबत येतात. पैशांची काही कमी पडणार नाही, असं म्हणत आरोपीने तरुणीसोबत गैरवर्तन केले.

तिच्यासोबत अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरली. तरुणीने या गोष्टीला नकार देताच आरोपीने तिला करियर बर्बाद करण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT