Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Breaking News: पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा कोडवर्ड आला समोर; गुन्हे शाखेने 'अशी' केली उकल

Pune Narcotics Case: पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. आरोपी स्वत:च्या नावासाठी कोडवर्ड वापरत असल्याचं समोर आलं आहे. गुन्हे शाखेने उकल कशी केली, ते आपण जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Akshay Badwe

Pune Crime Narcotics Case

पुणे (Pune) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत आहे. २१ फेब्रुवारी रोजी पुणे ड्रग्ज प्रकरणात आरोपींना मास्टरमाईंडने एमडी बनविण्याचा फॉर्म्युला दिला असल्याची माहिती मिळाली होती. आता रोज नवे खुलासे या प्रकरणात होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. (Latest Crime News)

मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींच्या टोळीने टोपण नावे तयार केली होती, अशी माहिती मिळतेय. या प्रकरणात वैभव माने आणि युवराज भुजबळ यांना अटक करण्यात आली (Pune Narcotics Case) आहे. भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे एमडीचा कारखाना सुरू केला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोपण नावांचा वापर

या प्रकरणात आरोपींनी टोपन नावांचा आरोप केला आहे. "लंबा बाल" आणि "मुंबई का बंदर" या कोडवर्डचा वापर करण्यात आला आहे. ही नावे कुणाची आहेत, तर सराईत वैभव माने याला केसांची शेंडी ( Vaibhav Mane) होती. त्यामुळे त्याला "लंबा बाल" म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ (Yuvraj Bhujbal) याला "मुंबई का बंदर" म्हणून बोलावलं जात होतं.

आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले ( Narcotics Case Accused Used Nickname) आहेत. या घटनेमुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिलं होतं.

पुणे पोलिसांची देशभर कारवाई

देशातील विविध शहरांमध्येपुणे पोलीसांची तब्बल दहा पथके एनसीबीला सोबत घेऊन कारवाई करत आहेत. देशातील दिल्ली, बेंगलोर हैदराबाद या प्रमुख शहरासह ड्रग्जचा शोध घेतला (Pune Crime) जात आहेत. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १८०० कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं.

विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या ५ जणांना पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. ड्रग्ज तयार करणाऱ्या एका इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येत (Pune Crime Narcotics Case) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT