Maval body partially buried Saam Tv News
क्राईम

Pune Crime : JCBने खड्डा खोदला, मृतदेह शेतात अर्धवट पुरला; मावळमध्ये खळबळ

Maval Crime News : पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

Prashant Patil

दिलीप कांबळे , साम टीव्ही

पुणे : पुण्यातील मावळच्या चावसर गावच्या हद्दीत जमिनीत मृतदेह अर्धवट पुरवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लोणावळा पोलीस स्टेशन ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेआधी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चावसर शिलिंब रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून मृतदेह अर्धवट पुरण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा असेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यात अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू आणून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काका-पुतणे या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

गोपाळ जयराम आचार्य (२५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, अमिर शेख आणि दानिश अली शेख असे आरोपींची नावे आहेत. आरोपी नात्याने काका पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी गोपाळ आचार्य याचा आरोपींशी दारू आणून देण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला. त्यानंतर हाणामारीला सुरूवात झाली. गोपाळवर आरोपींनी शस्त्रांनी वार करण्यास सुरूवात केली. या बेदम मारहाणीत गोपाळचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गोपाळच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर जयराम लोकनंदन आचार्य (५१) गोपाळच्या वडिलांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT