Pune Crime News AI Photo
क्राईम

Crime News : पुण्यातून अहिल्यानगरला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडचं शीर धडावेगळं केलं; कोयता घेऊन 4 किलोमीटर...

Crime News : अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे, पुण्यातील गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडने कोयत्याने वार करत संपवले आहे. त्यानंतर स्वत:च पोलिसांत गेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Namdeo Kumbhar

Pune Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरूणाने रागाच्या भरात गर्लफ्रेंडवर कोयत्याने वार केला. तिचे शीर धडावेगळं केलं अन् त्यानंतर पोलिसांना फोन केला. रक्ताने माखलेल्या कोयत्यासह आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमी युगुल पुण्यातील होते. फिरण्यासाठी ते राहुरीला गेले होते, तिथे दोघांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे जोरदार वाद झाला. संतापलेल्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर कोयत्याने सपासप वार केले, त्यानंतर तिचे शीर धडावेगळे केले. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (दि. 19) ही घटना घडली आहे. पैशांवरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.

सोनाली राजू जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी व्यक्तीचे नाव सखाराम धोंडिबा वालकोळी असे आहे. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही आंबेगाव तालुक्यातील राहाणारे आहेत. फिरायला गेल्यानंतर पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच रागाच्या भरात व्यक्तीने गर्लफ्रेंडवर कोयत्याने वार केला अन् शीर धडावेगळे केले. त्यानंतर स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. या घटनेने पुणे आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सखाराम हा गर्लफ्रेंड सोनालीसोबत बुधवारी वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेला होता. यावेळी सोनालीने आरोपीकडे पैशांची मागणी केली. 'मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन,' अशी धमकी तिने दिली. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सखाराम याला राग अनावर आला, त्याने कोयत्याने सोनालीवर सपासप वार करत शीर धडावेगळं केले.

सोनालीचा जीव घेतल्यानंतर सखाराम ४ किमी चालत वांबोरी पोलिसात पोहचला. त्याने स्वत:हून पोलिसांना बोलावून घेतले अन् मी माझ्या प्रेयसीला ठार मारले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमार्टमसाठी आणला. आरोपी सखारामला ताब्यात घेतलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Airtel Recharge : खुशखबर! ५० रुपयांत OTT, IPLची मज्जा; एअरटेलचा भन्नाट रिचार्ज प्लान

नाशिकमध्ये खरात पार्ट 2 ! महिलांसोबतचे 121 व्हिडिओ; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

SCROLL FOR NEXT