Money Heist-Style Burglary in Pune: Thieves Break Wall, Steal 30 Tolas of Gold 
क्राईम

एकदम मनी हाईस्ट! भिंत फोडून सराफा दुकानात शिरले अन् लुटलं तब्बल ३० तोळं सोनं

Pune Jewellary Shop Looted : पुण्यातील मांजरी परिसरातील मुंढवा रोडवरील आराध्या ज्वेलर्स या दुकानात ही चोरी घडली. दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून मोठे भगदाड पाडत चोरट्यांनी आत प्रवेश केला.

Akshay Badve

  • पुण्यातील मांजरी भागातील आराध्या ज्वेलर्समध्ये धाडसी चोरीची घटना घडली.

  • चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून प्रवेश केला.

  • सुमारे २५ ते ३० तोळे सोने आणि मोठ्या प्रमाणात चांदी चोरीला गेली.

पुण्यातील मांजरी भागातील एका सराफ दुकानावर धाडसी चोरीचा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही चोरीची घटना १२ जुलै रात्री पुण्यातील मुंढवा रोड भागात असणाऱ्या आराध्या ज्वेलर्समध्ये घडली. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या भिंतीला लक्ष केले आणि त्या भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि थेट सराफा दुकानात प्रवेश केला.

दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून त्यांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने चोरले आणि तिथून पसार झाले. दुकानाच्या मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे दुकानातील २५ ते ३० तोळे सोने आणि मोठ्या प्रमाणावर चांदी दुकानातून चोरीला गेली आहे. या दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

चोरीसाठी गेलेल्या मालाची अचूक किंमत आणि वजनाची पडताळणी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखेचे पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे.

चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली

भोर-कापूरहोळ मार्गावरील कासुर्डी येथे, अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. चोरीनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्क चोरट्यांनी सोबत नेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला..

परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या धाडसी चोरीमुळे कासुर्डी आणि परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कासुर्डी स्टॉप परिसरातील नवनाथ मालुसरे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गाळ्यांमध्ये ही चोरी घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांच्या वरील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दिपक मांगडे यांचे सदगुरु मेडिकल, विशाल मांढरे यांचे श्री समर्थ कृषी सेवा केंद्र तसेच सुप्रिया जांभळे यांचे अनुष्का कलेक्शन नावाच्या दुकानाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असुन या तीन दुकानांमधील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: महागड्या हेअर डायला विसरा! घरी बनवा नॅचरल हेअर डाय, केस होतील काळेभोर

हॉटेल स्टाईल क्रिस्पी कॉर्न फ्राईज स्टिक, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा ही रेसिपी|Crispy Corn Fries Sticks

१ महिना गवती चहा प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update: वारीच्या वाटेवर आरोग्यसेवेचा वसा; मोफत उपचारांनी वारकऱ्यांना नवी उमेद

Black & White : उद्धव ठाकरे, ऑपरेशन टायगर ते मराठी माणूस; १० प्रश्नांवर सचिन अहिरांची रोखठोक उत्तरे, Exclusive मुलाखत

SCROLL FOR NEXT