Pune News Saam Tv
क्राईम

Pune Crime: दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार, जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पुण्यातील घटना

Pune Crime News: पुण्यातील कात्रजजवळील संतोषनगर परिसरात ही भयंकर घटना घडली. अर्जुन मोरे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे

भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रजजवळील संतोषनगर परिसरात ही भयंकर घटना घडली. अर्जुन मोरे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील अर्जुन मोरे हा तरुण त्याच्या मामाच्या मुलासह संतोषनगर मध्ये सुरू असलेला दांडिया पाहायला गेला होता. त्यावेळी अमित चोरगे आणि त्याचे साथीदार तेथे आले. चोरगेचे यापूर्वी काहीजणांशी भांडण झाले होते. या वादातून आरोपींनी दांडिया कार्यक्रमात कोयते हवेत फिरवत दहशत माजवली. त्यांनी मोरे याच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात मोरे जखमी झाला.

या घटनेनंतर अर्जुन मोरे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुण्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला अमली पदार्थ विरोधी कारवाईत विशेष कामगिरी बजावल्याने २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरीची गृह विभागाने नोंद घेतली. पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुरकुंभ एमआयडीसी, विश्रांतवाडी, धानोरी, सांगली जिल्ह्यातील कुपवाड तसेच, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रोन अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT