Pimpari Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावलं, वाद विकोपाला गेला; तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Pimpari Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर घटना घडली. लग्नाची बोलणी करायला गेलेल्या तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ९ जणांना अटक करण्यात आली.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरात हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी बोलणी करायचे असल्याचे सांगून तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बोलावून घेतलं. त्यानंतर झालेल्या वादातून तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ११ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामधील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात घडली. देवकर पार्कमधील एका खोलीत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. रामेश्वर घेंगट असे मृत तरुणाचे नाव आहे. रामेश्वरचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.

कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतरही दोघेही लग्नावर ठाम होते. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत तरुणीच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला.

जखमी झालेल्या रामेश्वरला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याला वाचवण्या डॉक्टरांना यश आले नाही. ही माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर, करण खोकरसह एकूण ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ९ आरोपींना अटक केली. तर इतर दोन आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परतीच्या प्रवासात गणेशभक्तांवर वाहतुक कोंडीच विघ्न

Asia Cup 2025: आमदाराच्या जावयाला आशिया कपसाठी मिळाली संधी, BCCI ने दिली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

SCROLL FOR NEXT