पुणे: शहरात गुन्हेगारी वाढली असून दररोज मारहाण आणि हत्येच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहे. आज पुणे शहरातील कात्रज आणि स्वारगेट परिसरात हत्येच्या घटना घडल्या असून यात दोन जणांचा खून झाल्याचं वृत्त समोर आलंय. दरम्यान याप्रकरणी दोन्ही ठिकाणातील संबंधित पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
कात्रज परिसरात एका भाजी विक्रेत्याची हत्या झालीय. भाजी विक्रेत्याच्या डोक्यावर विटेने हल्ला केला गेला यात त्याचा जीव गेला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कात्रज परिसरातील दत्तनगर बस थांब्याजवळ ही घटना घडलीय. येथे २ अज्ञात व्यक्तींनी विलास जयवंत बांदल (वय ५५, रा. त्रिमूर्ती रेसिडेन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) यांच्या डोक्यात वीट घालून भाजी विक्रेत्याचा खून केला. ही हत्या का झाली कोणी याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
शहरातील दुसरी घटना स्वारगेट परिसरात घडलीय. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाने एका व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकत त्याचा खून केलाय. स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ भुयारी मार्गात ही घटना घडलीय. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाने अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. दरम्यान मृत व्यक्तीचे वय ३५ असून त्याची ओळख पटलेली नाहीये. याप्रकरणी पोलिसांनी गौतम घनश्याम तुरुकमारे (वय २८, रा. मार्केट यार्ड, मूळ रा. सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड) याला अटक केलीय. अधिक तपास स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
मुलाच्या हत्येसाठी दिली ७५ लाखांची सुपारी
पुण्यामध्ये वडिलांनीच आपल्या मुलाच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पण या हत्येचा प्रयत्न फसला आणि सुदैवाने मुलाचे प्राण वाचले. पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केलीय. संपत्तीच्या वादातून वडिलांनी हे कृत्य केल्याची माहिती तपासातून उघड झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.