pune crime  Saam Tv
क्राईम

Pune Crime: दोन अल्पवयीन मुलांचा धायरी परिसरात गोळीबार; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

Pune crime: सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात गोळीबारीची घटना घडलीय.

Bharat Jadhav

Pune Crime Firing :

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात गोळीबारीची घटना घडलीय. हा गोळीबार दोन अल्पवयीन मुलांनी केला असून यात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झालाय. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Latest News)

ंकार तानाजी लोहकरे, असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याचा मित्र सागर ढेबे हे दोघे धायरी येथून दुचाकीवर जात होते. त्यावेळी दोघा अल्पवयीन मुलांनी त्याचा दुचाकीवर पाठलाग केला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धायरीतील खडक चौकात आल्यानंतर त्यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून ओंकारवर पाठीमागून गोळीबार केला. त्यात ओंकारचा मृत्यू झाला. ओंकार बाल सुधारगृहात असताना त्याचा अल्पवयीन मुलांशी वाद झाला होता. त्यातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT