बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी लागल्याने एक तरुण जखमी झाला होता
पुण्यात केवळ २४ तासात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या.
कोल्हेवाडी येथे किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आला.
दुचाकी कट देण्यावरून वाद होऊन गोळीबार झाला.
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढलीय, शहरातील गुंडांनी रस्त्यावर धुडगूस घातलाय. दररोज वाहनांची जाळपोळीच्या घटना घडून लागल्या आहेत. आता गोळीबार करण्याच्या घटनेतही वाढ होतेय. आता अवघ्या २४ तासात पु्ण्यात दोन गोळीबारीच्या घटना घडल्या आहेत. पुण्याजवळील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार करण्यात आला. अगदी क्षुल्लक कारणावरून गोळीबार करण्यात आलाय.
दुचाकीला कट मारल्याच्या रागातून एकाने हवेत गोळीबार केलाय. दुचाकीला कट मारल्याच्या रागातून एकाने देशी बनावटीच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. गोळीबारीची घटना दुपारी कोल्हेवाडी परिसरात घडली. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलंय. तर पसार झालेल्या आणखी एका आरोपीचा शोध सुरूय.
मात्र २४ तासात दोन गोळीबारीच्या घटना घडल्याने खळबळ उडालीय. याआधी झोन 3 च्या हद्दीत रविवारी रात्रीच उत्तम नगर परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं एक तरुण जखमी झाला होता.
मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात मित्राकडूनच गोळी सुटली. गोळीबारात मित्राच्या पायात गोळी लागली होती. पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी रात्री ही घटना घडली होती. पिस्तूल लोड अनलोड करताना तरुणाकडून अचानक गोळी सुटली. ती गोळी समोर उभा असलेल्या मित्राच्या पायाला लागली. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ५ तरुण हे एका "पबजी" मोबाईल गेम खेळत होते.
दरम्यान यातील एकाने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि तो इतर मित्रांना दाखवायला लागला. याचदरम्यान अनर्थ घडला. पिस्तुलातून गोळी अचानकपणे सुटली. उत्तमनगर पोलिसांनी या तरुणांपैकी एकाकडे असलेलं पिस्तूल जप्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.